Women Harassment Case Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Crime | एक लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चौघे पोलिसांच्या रडारवर

वरोरा पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Warora Dowry Harassment

चंद्रपूर : हुंड्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केल्यासह शारीरिक व मानसिक छळ, शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या आरोपावरून वरोरा पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विवाहितेने १३ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

प्रिया अमित अढये (वय ३१) रा. शांतीनगर फेज-२, बोर्डा, वरोरा यांनी, दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा विवाह २०१९ मध्ये अमित मुणिराज अढये यांच्याशी झाला होता. लग्नाच्या वेळी वाहनासाठी एक लाख रुपये आणि सोन्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही रक्कम न दिल्यामुळे सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचे विवाहितेचे म्हणणे आहे.

पतीकडून मारहाण आणि नोकरी करण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. गर्भावस्थेदरम्यान त्रास झाल्याने गर्भपात झाल्याचे तसेच बाळाच्या जन्मानंतर वाद वाढल्याचे तक्रारीत नमूद आहे. जानेवारी २०२६ मध्ये आपल्याला बाळासह माहेरी यावे लागल्याचेही तिने म्हटले आहे.

यापूर्वी महिला तक्रार निवारण कक्षात तक्रार देऊनही त्रास सुरूच राहिल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. या तक्रारीवरून पती अमित अढये, सासू मीनाबाई अढये, सासरे मुणिराज अढये आणि नणंद यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT