Chandrapur news: आजारी असूनही वडिलांनी घरी नेले नाही; सैनिकी शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याने जीवन संपवले

एका खासगी शिक्षण संस्थेच्या सन्मित्र सैनिकी शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
Chandrapur news
Chandrapur newsFile Photo
Published on: 
Updated on: 

Chandrapur news:

चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगत बल्लारपूर मार्गावरील विसापूर येथे असलेल्या एका खासगी शिक्षण संस्थेच्या सन्मित्र सैनिकी शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जीवन विलास झरेकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

सैनिकी शाळेत जीवनचे हे पहिलेच वर्ष होते. गुरुवारी त्याला त्वचेच्या विकाराचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने त्याच्या वडिलांना तातडीने शाळेत बोलावून घेतले. जीवन पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याला तीन ते चार दिवसांसाठी गावी घेऊन जाण्याचा सल्लाही दिला होता, अशी माहिती आहे.

Chandrapur news
Chandrapur News : मुख्याध्यापकांनंतर अधीक्षकाचेही निलंबन; फोटो व्हायरल करणाऱ्या शिक्षकावर कारवाईची टांगती तलवार

मात्र, वडिलांनी जीवनला बाहेरील डॉक्टरांकडे नेऊन प्राथमिक उपचार केले आणि अवघ्या दोन तासांतच पुन्हा सैनिकी शाळेत आणून सोडले. गावी जाता येणार नसल्याने आणि पुन्हा त्याच वातावरणात राहावे लागणार असल्याने जीवन निराश झाला आणि रडू लागला.

त्यावेळी इतर सर्व विद्यार्थी मैदानात खेळण्यासाठी गेले होते. जीवन सुमारे सात ते आठ मिनिटे रडत होता. त्यानंतर त्याने वसतिगृहातील कॉटजवळ कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले. ही हृदयद्रावक घटना शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पोलीस आणि शाळा प्रशासनाने सीसीटीव्हीचे संपूर्ण फुटेज मृत विद्यार्थ्याच्या पालकांना प्रत्यक्ष दाखवले. या फुटेजमध्ये जीवन रडताना दिसत असून, त्यानेच जीवन संपवल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

Chandrapur news
Chandrapur News शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे अर्धे टक्कल! चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील संतापजनक प्रकार!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news