चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील मौजा पिरली येथे पैशांची बाजी लावून जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती मिळताच भद्रावती पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत चार जणांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत एकूण ४ लाख २९ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी, मुखबिरामार्फत माहिती मिळाली की मौजा पिरली (ता. भद्रावती) येथे काही इसम ५२ तास पत्त्यावर पैशांची बाजी लावून हारजीतचा खेळ खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांसह घटनास्थळी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत घनश्याम शेषराव उत्ताने (वय ५०) रा. मांगली, दिपक नथ्थूजी बोथले (वय ३३) रा. वाघेडा, मारोती उर्फ नंदकिशोर महादेव झाडे (वय ४२) रा. पिरली, हनुमान ज्ञानेश्वर देठे (वय ३५) रा. पिरली. अशी आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी मजुरी व्यवसाय करणारे आहे. आरोपींच्या अंगझडतीत व घटनास्थळावरून ३,१६० रुपये रोकड, डावावर लावलेले १,२५० रुपये, ६ मोटारसायकली (अंदाजे किंमत ४,२५,००० रुपये) आणि ५२ तास पत्ते (किंमत १०० रुपये) असा एकूण ४,२९,५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी क्रमांक १ ते ४ तसेच पसार असलेल्या वाहनचालक आरोपी क्रमांक ३ ते ७ यांच्या विरोधात पोलीस स्टेशन भद्रावती येथे अप. क्र. /२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील ग्रेड पोउपनि गजानन तुपकर, सफौ. महेंद्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, गोपाल आतकूलवार, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड आदी कर्मचाऱ्यांनी कामगिरी बजावली.