चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वार्डात घडलेल्या खुनाच्या घटनेने चंद्रपूर शहर हादरून गेले असतानाच पोलीस प्रशासनाने अवघ्या दोन तासांत गुन्ह्याचा छडा लावत चौघा आरोपींना अटक केली आहे. रामनगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही कारवाई करण्यात आली.
ही घटना दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री ०३:०० वाजताच्या सुमारास घडली. अष्टभुजा वार्डातील रहिवासी छोटू उर्फ मृणाल प्रकाश हेडाऊ (वय ३५) याला काही अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करून हत्या केली. याप्रकरणी रामनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(१), ३३३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली. परिसरात गोपनीय माहिती संकलित करून कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या दोन तासांत मृतकाला मारहाण करणारे चारही आरोपी निष्पन्न केले.
सुमोहित उर्फ गोलु चंद्रशेखर मेश्राम (वय २६), टिल्लू उर्फ अनिल रामाजी निकोडे (वय ३०), सुलतान अली साबीर अली (वय ३०), बबलु मुनीर सय्यद (वय ३८) सर्व आरोपी अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख (रामनगर पो.स्टे.), पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा), सपोनि दिपक कॉक्रेडवार, देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, प्रशांत लभाने, शिवाजी नागवे, पो.उपनिरीक्षक श्री. विनोद भुरले, हिराचंद गव्हारे, अतुल राठोड तसेच पोलीस अंमलदार गजानन नागरे, जितेंद्र आकरे, लालु यादव, शरद कुडे, आनंद खरात, विनोद यादव, बाबा नैताम, मनिषा मोरे, रजनीकांत पुठ्ठावार, इंदल राठोड, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्पलवार, रविकुमार ठेंगळे, हिरा गुप्ता, संदेश सोनारकर, प्रशांत झाडे, सुरेश कुरेवार, रुपेश घोरपडे व ब्ल्युटी साखरे यांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.