पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला 20 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. file photo
चंद्रपूर

चंद्रपूर : पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला 20 वर्षांची कारावासाची शिक्षा

Chandrapur News : अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधम आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने 20 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिवती पोलिस स्टेशन हद्दीतील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी 2020 मध्ये कलम 376, 376 (2), (एन), (जे), 506 भादंवि सहकलम 4, 5 (1) व 6 लैंगिक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा 2012 अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आले होते. तपास करुन आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. आज मंगळवारी विशेष सत्र न्यायाधिश ए. व्ही. दीक्षित यांनी, आरोपीला 20 वर्ष कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकार तर्फे सहा.सरकारी अभियोक्ता डी.व्ही. महाजन यांनी काम पाहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT