विदर्भ

भाडेकरूने केला घर मालकीणीचा खून; वारंवार भाडे मागितल्‍याने राग अनावर

अमृता चौगुले

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरातील नगीना बाग परिसरात राहात असलेल्या एका भाडेकरूने वारंवार भाडे मागणाऱ्या 64 वर्षीय घर मालकीणीचा खून केला. या घटनेने खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. श्रीमती शर्मीला शंकरराव सकदेव (वय ६६) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नगीना बाग परीस चंद्रपूर शहरातील नदिना बाग परिसरात सवारी बंगल्याजवळ श्रीमती शर्मीला शंकरराव सकदेव (वय ६६) ती राहत होती. तिच्या घरी एक भाडेकरू राहत होता. त्या भाडेकरूने काही महिन्याचे भाड्याचे पैसे थकविल्यामुळे 66 वर्षीय घर मालकीन भाड्याचे पैसे मागणी करीत होती. 17 मे 2023 ला रात्री सात वाजताच्या सुमारास मृतक महिलेच्या मुलीच्या मुलीने तिला फोन केला परंतु तिने फोनवर प्रतिसाद न दिल्यामुळे शेजारी राहणाऱ्या कपील श्रीराम सुखाडे यांना फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्‍न केला. परंतु संपर्क न झाल्‍याने तो घरी गेला असता महिला घरात फरशी वर रक्तबंबाळ अवस्थेत दिसली. यानंतर तेव्हा सुखाडे याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. रामनगर पोलिसांनी घटनस्थळी येऊन मृतदेहे ताब्यांत घेतला.

पोलिस पथकाने गोपनिय माहितीव्दारे चामोर्शी, (जि. गडचिरोली) येथून आरोपीला ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्याने गुन्हाची कबूली दिली. यानंतर त्‍याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT