विदर्भ

चंद्रपूर : नागभीड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

backup backup
चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  घरात एकटीच असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका ५० वर्षीय आरोपीने अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि.२२) उघडकीस आली. ही घटना नागभीड तालुक्यातील पळसगाव येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोहर नथ्यू चावरे  विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागभीड तालुक्याती पळसगाव येथील आरोपी मनोहर नथ्यू चावरे व एका अल्पवयीन ११ वर्षीय मुलीचे घर शेजारी शेजारी आहे. मुलीची आई  शनिवारी सकाळी शेतीच्या कामावर गेली होती. तर वडिल कामाकरीता बाहेर राज्यात गेले होते. त्यामुळे मुलगी सकाळी  आठच्या सुमारास एकटीच घरी होती. या संधीचा फायदा घेत आरोपीने घरी जावून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीची आई शेतावरून घरी परत आल्यानंतर मुलीचे हा सर्व प्रसंग आईला सांगितला. मुलीच्या आईने नागभीड पोलिसात जावून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी मनोहर चावरे याचे विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आकाशकुमार साखरे व वैभव कोरवते करीत आहेत.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT