चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूरचा ढाण्या वाघ अचानक काळाच्या पडद्याआड झाल्याने चंद्रपूर लोकसभा क्षेत्र पूर्णपणे पोरका झाला. या मतदार संघावरील छत्रछाया निघून गेली. परंतु, कार्यकर्त्यांनो घाबरून जावू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. त्यांचे मतदार संघातील अधूरे कार्य, राहिलेली कामे जिद्दीने पूर्ण करू. त्यांनी मतदारसंघाकरीता बघितलेले स्वप्न आणि मतदारांच्या अपेक्षाच्या पूर्ण करू, असे बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर म्हणाल्या आहेत.
शोकसभेला संबोधित करताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, इतरांच्या घरच्या शोकसभा घेता घेता स्वत:च्या घरची शुध्दा शोकसभा घ्यावी लागेल हा विचारही मनात आला नव्हता. ईश्वराने ती वेळ शुध्दा आमच्यावर आणली. शोकसभेत काही बोलण्यापेक्षा बाळू धानोरकर सांगून जाते. अतिशय कमी वयात या माणसानं इतिहास घडविला. शिवसेनेचा शाखा प्रमुखापासून तर किसान सेनेचे अध्यक्ष, उप जिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, आमदार, लोकसभेचे संपर्कप्रमुख आणि २०१९ मध्ये खासदार निवडून आले. त्यानंतर स्वतच्या पत्नीला तिकीट मागून निवडणूक लढविणे आणि जिंकून आणने, ही रिस्की बाब होती परंतु ती शुध्दा यशस्वी करून दाखविली.
बाळू धानोरकर यांनी, चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेतच नाहीत हेवा वाटावा असे काम त्यांनी महाराष्ट्रात केल्याचे प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. त्यांनी काम करताना, जातीचा पक्षाचा कधीच विचार केला नाही. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत गरीबातील गरीबापर्यंत मदत कशी करता येईल याचाच प्रयत्न केला. २५ मे पासून त्यांची तब्बेत बिघडली. त्यांनतर दोन दिवस नागपूरला भरती राहिल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी शेवटपर्यंत वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या बॉडीने प्रतिसाद दिला नाही. स्टोनचे इन्फेक्शन किडनीवर वाढल्यामुळे बिपी शुगर कमी होऊन ऑक्सीजनची लेव्हल कमी झाली. त्यामुळेच त्यांना प्राण गमवावा लागला, असेही धानोरकर म्हणाल्या आहेत.
हेही वाचंलत का?
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.