UP Bus Accident Victims Buldhana Akola Pudhari
बुलढाणा

UP Bus Accident | उत्तर प्रदेशात बस अपघात; बुलढाणा, अकोल्यातील २ महिला यात्रेकरूंचा मृत्यू

नेपाळमधील पशुपतिनाथ दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बसचा उत्तर प्रदेशातील गाजीपूरजवळ भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

UP Bus Accident Victims Buldhana Akola

बुलढाणा : नेपाळमधील पशुपतिनाथ दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बसचा उत्तर प्रदेशातील गाजीपुरजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील दोन महिला यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला असून ३५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

‘जय श्रीराम टुर्स अँड ट्रॅव्हल्स’तर्फे आयोजित यात्रेसाठी महाराष्ट्रातील भाविक अयोध्या व इतर तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी गेले होते. गुरुवारी (दि. ९ एप्रिल) सकाळी सुमारे ११.३० वाजता वाराणसी–गोरखपूर महामार्गावर गाजीपुरजवळील नंदगंज परिसरात ही बस भरधाव वेगात असताना दुभाजकाला धडकली.

या अपघातात अकोला जिल्ह्यातील अन्नपूर्णाबाई (वय ५०) आणि बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील सरस्वतीबाई पाखरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात इतर ३५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे, तर उर्वरित प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उत्तर प्रदेश सरकारशी संपर्क साधून जखमींना तातडीने मदत व उपचार देण्याची विनंती केली. बुलढाणा जिल्हा प्रशासन देखील मदतकार्याकरिता सतत संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT