babies file photo
बुलढाणा

Buldhana news: आश्चर्यकारक! महिलेने एकाच वेळी दिला ४ बाळांना जन्म; घरातच झाली प्रसूती, डॉक्टरही चक्रावले

एका महिलेने घरातच झालेल्या मुदतपूर्व प्रसूतीमध्ये एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये ३ मुले आणि १ मुलगी आहे.

पुढारी वृत्तसेवा

Buldhana news

बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील चारबन या आदिवासीबहुल छोट्या गावात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. रियाणी पंशाराम सस्त्या (वय २७) या महिलेने घरातच झालेल्या मुदतपूर्व प्रसूतीमध्ये एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये ३ मुले आणि १ मुलगी आहे.

कोणत्याही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना प्रतिकूल परिस्थितीत ही प्रसूती सुखरूपपणे पार पडल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. प्रसूतीनंतर मातेसह नवजात चारही बाळांना जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

वैद्यकीय तपासणीत मातेसह बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे दिसून आले; मात्र प्रसूती मुदतपूर्व झाल्याने व नवजात बाळांचे वजन प्रत्येकी केवळ ९०० ग्रॅमच असल्याने अतिदक्षतेच्या आवश्यक उपचारासाठी माता व चारही बाळांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रियाणी सस्त्या या महिलेला याआधी २ मुली व १ मुलगा असून आता कुटुंबातील अपत्यांची संख्या एकूण ७ झाली आहे. एकाच प्रसूतीमध्ये चार बाळांचा जन्म होण्याची घटना ही दुर्मिळ असल्याने लोकांमध्येही कुतूहल व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT