मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेद विद्यालयाच्या वास्तूचे भूमिपूजन झाले File Photo
बुलढाणा

CM Eknath Shinde | खामगाव येथे वेद विद्यालयाच्या वास्तूचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: खामगाव शहरातील जगदंबा देवी मंदिर घाटपुरीच्या प्रांगणात श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान आळंदी द्वारे उभारण्यात येणा-या जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नियोजित वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (दि. ३) करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती

या भूमिपूजन समारंभास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, देवी संस्थानचे अध्यक्ष पंकज . उपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टड, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी घेतले श्री जगदंबा मातेचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री जगदंबा मातेचे दर्शन घेऊन पूजन केले. तसेच जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी संस्थांनच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायांशी संवाद साधला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT