‍Baba Bageshwar pudhari
बुलढाणा

बागेश्वर बाबाच्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात काँग्रेस आक्रमक, सर्व जिल्हा मुख्यालयी करणार निषेध आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना या विषयी एक पत्र पाठवले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Congress takes an aggressive stance against Bageshwar Baba's controversial remarks.

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा :

धिरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी नागपूर येथे एका जाहीर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याने राज्यात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याच अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना २४ एप्रिल रोजी पाठवलेल्या एका पत्राद्वारे दोन दिवसांत धिरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा आणि भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्याचे सांगण्यात आले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, धिरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात इतिहासाची मोडतोड करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अत्यंत चुकीचे वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. ही बाब अत्यंत निंदनीय आहे.

या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवाजी महाराजांचा अपमान होत असतांना विरोध न करता बघ्याची भूमिका घेतली आहे. यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, कांग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा तसेच भाजपा व रा.स्व.संघाच्या विरोधात येत्या दोन दिवसांत सर्व जिल्हा मुख्यालयी तीव्र निदर्शने करून निषेध व्यक्त करावा.

तसेच धिरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची व महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी कांग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात यावी‌. प्रदेश उपाध्यक्ष ॲड.गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT