Harshvardhan Sapkal Pudhari
बुलढाणा

Harshvardhan Sapkal: 'वाटल्या नोटा.... कमळाबाई बांधते आता सत्तेचा फेटा'; सपकाळांचा उखाण्यातून भाजपला टोला

अनोख्या पद्धतीने उखाणा घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महापालिका निकालावर प्रतिक्रिया दिली आहे

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation Election Result 2026

बुलढाणा : खेळली नुरा कुस्ती मित्रांसोबत, केल्या विकासाच्या बाता, कमळाबाई म्हणते चला आता लोकशाहीचा गळा कापा.. त्याचबरोबर "करुन घेतलं बोगस मतदान, वाटल्या नोटा.. निवडणूक आयोगाच्या मदतीने कमळाबाई बांधते आता सत्तेचा फेटा..!

राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे, यावर अनोख्या पद्धतीने उखाणा घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील महानगरपालिकांच्या आतापर्यंत आलेल्या निकालावर सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.. तर काँग्रेसने सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका पार पाडलेली आहे, असेही यावेळी सपकाळ यांनी म्हटले आहे. दोन तीन दिवसांत ज्या काही घटना, घडामोडी समोर आल्या आहेत. त्यावरून ही निवडणूक देखील फ्री अँड फेअर झालेल्या नाहीत, असा खळबळजनक आरोप सपकाळ यांनी यावेळी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT