खामगाव शहरात एका पालकाने आपल्या लेकीला उंटावर बसवून शाळेत नेले Pudhari
बुलढाणा

Buldhana School News | अभिनव शाळा प्रवेशोत्सव: खामगावात पालकाने लाडक्या लेकीला उंटावर बसवून नेले शाळेत

शैक्षणिक संस्थांनी शाळा प्रवेशोत्सव सोहळे आयोजित करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

पुढारी वृत्तसेवा

Khamgaon Girl Arrives To School On Camel

बुलढाणा: विदर्भातील सर्वच शाळांची घंटा मंगळवारी (दि.३०) वाजली. उन्हाळी सुटीनंतर नव्या सत्रातील पहिल्या दिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक संस्थांनी शाळा प्रवेशोत्सव सोहळे आयोजित करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

खामगाव शहरात एका पालकाने आपल्या लेकीला उंटावर बसवून शाळेत नेले व आपल्या कृतीतून 'बेटी बचाओ बेटी,पढाओ' हा सकारात्मक संदेश सार्थ ठरविला. खामगाव शहरातील सराफा मोहल्ल्यातील रहिवासी रवी जोशी यांनी त्यांची मुलगी क्षिप्रा हिचा सहाव्या वर्गातील प्रवेशाचा पहिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

क्षिप्राच्या आईने तीचे औक्षण केले. तर वडिलांनी मोठ्या हौसेने तिला सजवलेल्या उंटावर बसवून लायन्स ज्ञानपीठ शाळेपर्यंत पोहचवले.मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणा-या या अभिनव उपक्रमाचे पालकवर्गात कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT