बुलढाणा

बुलढाणा : ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

backup backup

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : शहरापासून चार कि.मी. अंतरावर एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर यात पाच वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला. बुलढाणा-खामगाव मार्गावर सायंकाळी ५ च्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये पती-पत्नी व सुनेचा मृत्यू झाला. तर पाच वर्षीय नातू मात्र दुर्घटनेतून वाचला.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भादोला येथील बब्बू शेख मुव्ही(वय ५५), हमइदआबई शेख बब्बू (५०) हे पती-पत्नी ,त्यांची सुन फिरदौस कंजूस शेख (२२) आणि नातू शेख नजीर शेख नदीम (४)असे एकाच परिवारातील चार जण बुलढाण्याहून भादोला गावाकडे दुचाकीवरून परतत होते.सायंकाळच्या सुमारास पाठीमागून आलेल्या व फुलांनी भरलेल्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात पती-पत्नी जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या सुनेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताच्या घटनेनंतर चालक वाहन घेऊन पसार झाला आहे. बुलढाणा ग्रामीण पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT