जीवन संपविले Pudhari
बुलढाणा

Buldhana Crime : 'शेती विकूनही कर्ज फेडू शकलो नाही,' भावनिक चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने संपविले जीवन

चोंडी टाकळेश्वर गावातील दुर्दैवी घटना

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा : अलिकडच्या काळात नापिकीमुळे आधीच वाढलेला कर्जाचा बोजा त्यातच यावर्षीच्या दुष्काळाची प्रचंड धग यामुळे नैराश्य आलेल्या एका शेतक-याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर गावात शनिवारी (दि.३) पहाटे ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. शंकर रामभाऊ भारसाकळे (४९) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

शंकर भारसाकळे यांनी लिहलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीत 'माझ्यावर कर्जाचा मोठा बोजा आहे. एक वावर विकले एक गहाण ठेवले तरीही ते कर्ज फिटले नाही. बायकोची पोत गहाण ठेवूनही पाहिजे तितके पैसे मिळाले नाही, त्यामुळे मी जीवन संपवत आहे,' असे त्यांनी या चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. त्यांच्या जाण्याने चोंडी टाकळेश्वर गावात शोककळा पसरली आहे.

महसूल मंत्री जिल्हा दौ-यावर

राज्याचे महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रीमंडळात उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज (दि.३) दुपारी बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौ-यावर आले होते. तत्पूर्वीच कर्जबाजारी शेतक-याने नैराश्यातून जीवन संपविल्याची ही घटना समोर आली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT