Gajanan Maharaj Shegaon Pudhari
बुलढाणा

Gajanan Maharaj Shegaon | श्री संत गजानन महाराज संस्थानला गिरडा येथे यात्रास्थळ विकासाला मंत्रिमंडळाची मंजुरी

शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानला ३ हेक्टर ८१ आर जमिनीवर कायमस्वरूपी बांधकामाची परवानगी

पुढारी वृत्तसेवा

Girda Pilgrimage Development

बुलढाणा, : श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव यांना बुलढाणा तालुक्यातील गिरडा येथे यात्रास्थळ विकसित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. वृक्षलागवडीसाठी संस्थानला देण्यात आलेल्या १९ हेक्टर ६ आर शासकीय जमिनीपैकी ३ हेक्टर ८१ आर क्षेत्रावर भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी कायमस्वरूपी बांधकाम करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने गिरडा येथे यात्रास्थळ विकासाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्मृतीकेंद्र, इको टुरिझम सेंटर, शांती कुटीर, निवास संकुल, सभागृह, प्रदर्शन केंद्र, खुले मंच, नॅचरोपॅथी केंद्र, आयुर्वेदिक संशोधन केंद्र, रुग्णालय तसेच ग्रामीण कुटीर उद्योग उभारण्याचे नियोजन आहे.

या प्रस्तावाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४० अंतर्गत निर्धारित अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गिरडा येथे यात्रास्थळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, या निर्णयानुसार कायमस्वरूपी बांधकामासाठी मंजूर केलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त उर्वरित १५ हेक्टर २५ आर जमिनीचा वापर केवळ वृक्षलागवडीसाठीच करणे बंधनकारक राहणार आहे. या अटीमुळे यात्रास्थळ विकासासोबतच वृक्षलागवडीचे मूळ उद्दिष्टही कायम ठेवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT