Lakhandoor Taluka Accident
भंडारा: लाखांदूर तालुक्यातील राजनी गावात विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू झाला. युवराज जाधव थेरे रा. राजनी असे या तरुणाचा नाव आहे. आज (दि. ३) सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पुढील तपास लाखांदूर पोलिस करीत आहेत.
युवराज जाधव थेरे यांचे राजनी येथे नवीन घर बांधण्यात आले होते. ते दररोज रात्री त्या नव्या घरी झोपण्यासाठी जात होते. २ रोजी जुलै रोजी ते नव्या घरात गेले होते. घराजवळील विद्युत खांबावर त्यांनी काही कारणास्तव वायर टाकली असता त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.