Highway Accident File Photo
भंडारा

Bhandara Highway Accident | महामार्गावर दोन अपघात; १ ठार, ३ जण जखमी

गडेगावजवळ कारच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू, आंबाडी येथे दोन युवक जखमी

पुढारी वृत्तसेवा

Two Accidents On Bhandara Highway

भंडारा : जिल्ह्यातील महामार्गांवर मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले. आंबाडी येथे कार आणि दुचाकीच्या धडकेत दोन युवक जखमी झाले. तर नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव येथे कारने स्कुटीला धडक दिल्याने ५८ वर्षीय स्कुटीचालकाचा मृत्यू झाला.

नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव येथे मंगळवारी सायंकाळी ७.२० वाजताच्या सुमारास कारने स्कुटीला धडक दिली. संजय केशव बडवाईक (५८, रा. मुरमाडी, ता. लाखनी) हे पत्नीसमवेत एमएच ३६ क्यू ४४६३ क्रमांकाच्या स्कुटीने मुरमाडीकडून लाखनीकडे जात होते.

यावेळी नागपूरकडून रायपूरच्या दिशेने जाणाºया भरधाव कार क्र . एमएच ३१ ईयु ३४५५ ने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय बडवाईक यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. नाणीजधामच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेतली. जखमी बडवाईक यांना लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अतिरक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लाखनी पोलिसांनी कारचालक वकार युसुफ अब्दूल मोहित सिद्दीकी रा. दुर्ग याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

दुसरा अपघात पवनी मार्गावरील आंबाडी येथे घडला. कार आणि मोटारसायकलची धडक झाली. या अपघातात आदित्य काशीराम पाचोडे (२३, रा. सिल्ली, ता. भंडारा) आणि स्वप्निल नामदेव गजबे (२८, रा. केसलेवाडा, ता. मोहाडी) हे दोघे जखमी झाले. दोघेही एमएच ३५ क्यू ७०८४ क्रमांकाच्या मोटारसायकलने पवनीकडून भंडाऱ्याकडे येत होते.

दरम्यान, भंडाऱ्याकडून पवनीकडे जाणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. नाणीजधामच्या रुग्णवाहिकेने जखमींना तातडीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT