Snake Friend Injured
भंडारा: पोल्ट्री फार्मजवळ जेसीबीने काम सुरू असताना सुमारे पाच फूट लांबीच्या नाग साप जखमी झाला. ही माहिती सर्पमित्राला देण्यात आली. सर्पमित्राने घटनास्थळ गाठून मोठ्या शिताफीने नागाला पकडले. त्याच्या जखमेवर औषधोपचार करून बरणीत भरत असतानाच सापाने सर्पमित्राला दंश केला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील मेंढा- चप्राड येथे घडली.
अक्षय रामभाऊ बगमारे (वय २३, रा. मेंढा) असे सर्पमित्राचे नाव आहे. अक्षयची प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय ठाकरे यांनी दिली.