Saras Crane PUDHARI
भंडारा

Saras Crane Bhandara | भंडाऱ्यात तीन दुर्मिळ सारस पक्षी आढळले: पक्षीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण

बावनथडी नदीकाठी अधिवास, संवर्धन क्षेत्र विकसित करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Tumsar Bawanthadi River Birds

भंडारा:
तुमसर तालुक्यातील बपेरा (सिहोरा) परिसरातील बावनथडी नदीच्या काठावर ३० सप्टेंबर रोजी तीन दुर्मिळ सारस पक्षी आढळून आले. एकाच ठिकाणी तीन सारस पक्षी दिसल्याने पक्षीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी बपेरा-सिहोरा परिसर सारस संवर्धन क्षेत्र म्हणून विकसित करावा, अशी मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे.

महाराष्ट्रात या पक्षाचे अस्तित्व प्रामुख्याने भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत तसेच लगतच्या बालाघाट जिल्ह्यात आढळते. तुमसर तालुक्यात सुमारे चार ठिकाणी सारस पक्ष्यांची नोंद असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

सुमारे पाच फूट उंचीचा आणि सहा ते सात किलो वजनाचा सारस पक्षी लांब पाय, लाल डोके व पांढरट-तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येतो. तो सहसा जोडीने राहतो. एकाच जोडीदाराशी आयुष्यभर एकनिष्ठ राहण्याच्या स्वभावामुळे सारसाला प्रेम व निष्ठेचे प्रतीक मानले जाते. बावनथडी नदी परिसरातील सारसांची उपस्थिती जैवविविधता आणि पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, अशी माहिती तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जी. रहांगडाले यांनी दिली.

सारस पक्ष्यांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाºयांच्या पुढाकाराने जिल्हा सारस संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण, पक्ष्यांचे संवर्धन आणि स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम समितीमार्फत केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT