चिमुरडीच्या डोळ्यासमोर आईचा खून; दिरानेच आवळला गळा, भागडी येथील घटना  File Photo
भंडारा

Bhandra Crime News : चिमुरडीच्या डोळ्यासमोर आईचा खून; दिरानेच आवळला गळा, भागडी येथील घटना

या घटनेतील संशयित घटनास्थळावरून फरार झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mother Murdered Before Little Girl's Eyes; Relative Strangles Her

भंडारा : पुढारी वृत्तसेवा

लाखांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भागडी येथे एका ३० वर्षीय महिलेची तिच्याच नात्यातील दिराने उशीने तोंड दाबून आणि धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. माधुरी तुळशीदास अंबादे (वय ३०, रा. ब्रह्मपुरी) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी संशयित आरोपी गौरव अंबादे (रा. ब्रह्मपुरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधुरी अंबादे ही संशयित आरोपी गौरव अंबादे आणि तिच्या चिमुरडीसह रविवारी (दि. २६) रात्री पालांदूर येथील एका लग्नावरून परत येत होती. रात्री उशीर झाल्यामुळे त्यांनी भागडी येथील त्यांच्या नातेवाईक नाजुका युवराज गणवीर यांच्याकडे मुक्काम ठोकला. रात्री सर्वजण जेवण करून झोपले असताना, पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पहाटे ३ वाजेच्या सुमारास माधुरी यांची मुलगी जान्हवी हिच्या ओरडण्याचा आवाज आल्याने घरमालक नाजुका गणवीर यांना जाग आली. त्यांनी पाहिले असता, गौरव अंबादे हा घाईघाईत दुचाकीवरून पळून जात होता. जेव्हा नाजुका यांनी घरात जाऊन पाहिले, तेव्हा माधुरी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या गळ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या, तर तिचे पाय स्कार्पने बांधलेले होते.

चिमुरडीने सांगितला थरार

माधुरी यांची मुलगी जान्हवी हिने दिलेल्या माहितीनुसार, तिला लघुशंकेसाठी जाग आली असता, गौरव अंकल तिच्या मम्मीच्या तोंडावर उशी ठेवून तोंड दाबत होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळजनक वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच नाजुका गणवीर यांनी पतीसह पोलिस पाटील मंजुषा कुरंजेकर यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ लाखांदूर पोलिस स्टेशनला धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT