भंडाराः लाखनी तालुक्यातील चांन्ना/धानला येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत बंधारा गाळ काढणे काम सुरु आहे. याठिकाणी एका मजुराने काडी-कचरा पेटवीला असता झाडावर असलेल्या मधमाशीच्या पोळीला धूर लागल्याने मधमाशा चवताळल्या त्यांनी उपस्थित असलेल्या 236 मजुरांपैकी आठ मजुरावर अचानक हल्ला चढवून गंभीर जखमी केले. यात चार पुरूष व चार महिला जखमी झाल्या. ही घटना शनिवारी १७ मे रोजी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली.
यामध्ये भाग्यश्री कपिल सावरकर 30 वर्ष, शंतनू सुजित गोस्वावी 21 वर्ष, प्रमोद देवाजी कावळे 40 वर्ष, उर्मिला मनोहर बनकर 61 वर्ष, सुनीता संदीप देशपांडे 55 वर्ष, संदीप बापूराव देशपांडे 58 वर्ष, कोमलचंद हरीचंद्र बनकर 29 वर्ष, पुष्पा उमेश बांडेबूचे 52वर्ष सर्व रा. चांन्ना असे जखमींचे नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, चांन्ना येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत बंधारा गाळ काढणे काम सुरु आहे. याठिकाणी मधमाशांनी हल्ला केला. जखमीना सामाजिक कार्यकर्ता विजय सार्वे तसेच माजी पं. स.सभापती प्रणाली सार्वे यांनी पोहरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी जखमींवर उपचार केले.