भंडारा : येथील राष्ट्रीय महामार्गावरील साई प्रसाद हॉटेलसमोर रविवारी रात्री भीषण अपघात घडला. यामध्ये बोलेरो कार आणि ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.
या अपघातात मृतांमध्ये अशोक फुलचंद देहरवाल (४८ वर्षे, नागपूर), शैलेंद्र लेखाराम बघेल (३४ वर्षे, खापरी, नागपूर), शैलेश पन्नालाल गोकुळपुरे (४० वर्षे, एअरफोर्स नगर), मुकेश बिंजेवार (३२ वर्षे, वाडी, नागपूर) यांचा समावेश आहे.
दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या अविनाश नकाटोडे यांच्यावर भंडारा सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. अविनाश हा ड्रायव्हर होता, असे सांगितले जात आहे. या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला.