Fraud News  File Photo
भंडारा

Bhandara Fraud | सोने शुद्ध करण्याच्या नावाखाली अफरातफर करुन ४२ लाखांची फसवणूक

तुमसर शहरात पोलिसांकडून गुन्हा नोंद

पुढारी वृत्तसेवा

Tumsar Gold Fraud
भंडारा: सोने शुद्ध करण्याच्या नावाखाली सोन्याची अफरातफर करुन ४२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार तुमसर शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोने शुद्ध करणाऱ्य विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

तुमसर शहरातील शेख रहमत अली शेख सोरब अली हे मागील १५ वर्षांपासून विशाल राजेंद्र भारती (रा. तुमसर) याच्याकडे सोने शुद्ध करण्यासाठी देत असत. ९ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत शेख रहमत यांनी आरोपी विशाल भारती याला ४८८ ग्रॅम कच्चे सोने शुद्ध करण्यासाठी दिले होते.

त्यापैकी ३८६.९०० ग्रॅम सोने शुद्ध करुन परत करणे अपेक्षित होते. परंतु, भारती याने फक्त ८६.४०० ग्रॅम सोने शुद्ध करुन परत केले. तर ३००.५०० ग्रॅम सोने परत न करता फसवणूक केली. या सोन्याची किंमत ४२ लाख ३७ हजार रुपये आहे. याप्रकरणी शेख रहमत यांनी तुमसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT