प्रातिनिधीक फोटो  (File Photo)
भंडारा

Bhandara Bribe | लाखनी येथे ११ हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास अटक

भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Setu Kendra Operator Arrested

भंडारा: मूळ शैक्षणिक कागदपत्रे परत देण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सेतू केंद्रचालकास भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.१०) लाखनी येथे करण्यात आली. सतीश तुळशीराम मोटघरे (रा. सिंधी लाईन, लाखनी) असे लाचखोर सेतू केंद्रचालकाचे नाव आहे.

यातील तक्रारदार हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे नोंदणीकृत कामगार आहेत. नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून शिष्यवृत्ती मिळते. तक्रारदार यांनी सन २०२१ मध्ये शिष्यवृत्तीकरिता सतीश मोटघरे याच्या सामान्य सेवा केंद्र, लाखनी येथून आॅनलाईन अर्ज भरलेला होता.

त्यावेळी सतीश मोटघरे याने तक्रारदार यांच्या मुलांचे दहावीची मार्कलिस्ट, डोमिसाईल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, नॉन क्रीमीलेअर सर्टिफिकेट, आधार कार्ड, कामगार कार्ड ही मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यानंतर वारंवार तक्रारदार यांनी त्यांची मूळ कागदपत्रे परत करण्यासाठी सतीश मोटघरे यांचेकडे पाठपुरावा केला. परंतु त्याने मूळ कागदपत्रे परत करण्यास टाळाटाळ केली.

३० जानेवारी रोजी तक्रारदार यांनी सतीश मोटघरे याच्या सेतू सेवा केंद्रात भेट घेत त्यांचे मूळ कागदपत्रे परत करण्याची विनंती केली. यावर सतीश मोटघरे याने मूळ कागदपत्रे परत करण्यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालय, भंडारा येथील अधिकारी व स्वत:करिता १२ हजार रुपये लाचेची मागणी केली. आज १० फेबु्रवारी रोजी नेहा सेतू केंद्र, सिंधी लाईन चौक, लाखनी येथे सापळा कारवाई दरम्यान तक्रारदाराकडून ११ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना सतीश मोटघरे याला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

त्याच्याविरुद्ध लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक नितेश देशमुख, उज्वला मडावी, प्रतीक उके, मयूर सिंगणजुडे, अतुल मेश्राम, मिथुन चांदेवार, शिलपेंद्र मेश्राम, विष्णू वरठी, हिरा लांडगे, हितेश हलमारे, सुमेध रामटेके, दुर्गा साखरे, पंकज सरोते यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT