Sakoli Lake Waste Weir Pudhari
भंडारा

Bhandara Lake Breach | तलावाची पाळ फुटली, धान शेतीचे नुकसान

साकोली तालुक्यातील सुंदरी येथील घटना, शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Sakoli Lake Waste Weir

भंडारा : साकोली तालुक्यातील सुंदरी येथील शंभर वर्ष जुन्या आणि जीर्ण झालेल्या तलावाची पाळ मंगळवारी (दि.२८) पहाटे ३ वाजताच्या सुमारास अचानक फुटली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठे नुकसान झाले.

पाण्याच्या जोरदार प्रवाहाने शेतकरी योगेंद्र झोडे यांचे सुमारे दीड एकर धान पीक पूर्णपणे वाहून गेले, तर आजूबाजूच्या परिसरातील सुमारे ४ ते ५ हेक्टर क्षेत्रातील धान पिकाला फटका बसला. प्राथमिक अंदाजानुसार, सुमारे १२ शेतकºयांचे १५ एकर शेतजमिनीवरील धान पिकाचे नुकसान झाले आहे.

माहितीनुसार, सुंदरी गावातील ३.१२ हेक्टर मध्ये हे तलाव १८९० साली बांधण्यात आले होते. अनेक दिवसांपासून ते जीर्ण अवस्थेत होते. मंगळवारी सकाळी, तलावाची पाळ अचानक फुटल्याने, शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आणि धानाची पिके वेगाने पाण्याखाली गेली.

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार निलेश कदम, तलाठी मरसकोल्हे, तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे, कृषी सहाय्यक दुर्गा प्रसाद भोंडे, सिंचन विभागाचे जितेंद्र दिघोरे आणि ग्राम अधिकारी पी. एम. झोडे दाखल झाले. अधिकाºयांनी नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली आणि पंचनामा प्रक्रिया सुरू केली.

अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली जात आहे. शेतकºयांना खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या या नुकसानीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. बाधित शेतकऱ्यांनी तात्काळ आर्थिक मदत, विशेष अनुदान आणि पीक नुकसानीची पुरेशी भरपाईची मागणी केली आहे. प्रशासनाने सविस्तर पंचनामा अहवाल तयार करून मदतीचे प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT