Nagzira sanctuary forest worker bear attack
भंडारा : भंडारा - गोंदिया जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव- नागझिरा अभयारण्यात अस्वलाने वनरक्षक आणि वन मजुर यांच्यावर हल्ला केला. यात दोन वन मजूर गंभीर झाले असून त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२२) घडलेल्या या घटनेने वन विभागात खळबळ माजली आहे.
आज नागझिरा वन्यजीव अभयारण्य, सहवनक्षेत्र नागझिरा संकुल, नियतक्षेत्र कपाळदेव मधील कक्ष क्र 94 मध्ये वनरक्षक एस. जी. तंतरपाळे हे वनमजूर माणिकराम गोविंदा चौधरी आणि गुणेश हिवराज शहारे यांच्या सोबत सकाळी नियमित गस्त करत होते.
दरम्यान, जंगलात दबा धरून असलेल्या अस्वलाने हल्ला केला. त्यामध्ये माणिकराम चौधरी, गुणेश शहारे हे गंभीररीत्या जखमी झाले आहे. त्यांना साकोली येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय, नागपूर येथे भरती करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.