भंडारा: जिल्ह्यातील अड्याळ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दोन वेगवेगळ्या गावात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या संतापजनक घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एका घटनेत १४ वर्षीय मुलगी गरोदर झाली आहे. दोन्ही घटनेतील आरोपींना अड्याळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या एका गावात ६ वर्षीय मुलगी आपल्या घरासमोर खेळत असताना आरोपी गणेश गोटेफोडे (३०) रा. वाकेश्वर याने तिचे तोंड दाबून लगतच्या वाडीत नेले. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. पिडीतेने वारंवार आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने तिला सोडले नाही. त्यानंतर मुलगी रडत घरी आली व तिने घडलेली घटना आपल्या आईला सांगितली. आईने तात्काळ अड्याळ पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी गणेश गोटेफोडे याच्याविरुद्ध पोस्को गुन्ह्यासह भारतीय न्यास संहितेच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून तपास पोलिस उपनिरीक्षक मांदाळे करीत आहेत.
दुसरी घटना याच पोलिस ठाण्यांतर्गत दुसर्या गावात उघडकीस आली आहे. एका १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आरोपीने तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गरोदर राहिली. अभय विलास धुर्वे (२१) रा. बोरगाव खुर्द असे आरोपीचे नाव आहे. ही घटना फेब्रूवारी ते मार्च या कालावधीत घडली. आरोपीला पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असून सुध्दा तिच्यासोबत प्रेमसंबंध जुळवून तिच्या इच्छेविरुध्द वांरवार शारीरीक संबंध निर्माण केले. पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.