Bhandara Bus Accident  File Photo
भंडारा

Bhandara Bus Accident | मेंढ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याखाली घसरली, बस चालकाचे प्रसंगावधान

लाखांदूर तालुक्यातील बोरगाव-चिचाळ रस्त्यावर घटना

पुढारी वृत्तसेवा

Borgav Chichal Bus Accident News

भंडारा: लाखांदूर तालुक्यातील बोरगाव-चिचाळ रस्त्यावर आज (दि.९) दुपारी सुमारे १२.३० वाजता एसटी बसचा अपघात झाला. साकोली आगाराची एसटी बस साकोलीवरून राजुराकडे जात असताना रस्त्यावर अचानक मेंढ्यांचा कळप आल्याने एसटी बस चालक अमरदिप नंदागवळी यांनी प्रसंगावधान राखून मेंढ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यावेळी आलेल्या वळणामुळे बस रस्त्याच्या कडेला खाली उतरली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आली आणि पुढील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT