भंडारा

भंडारा: मळणी यंत्रात डोके अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

अविनाश सुतार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा :  पवनी तालुक्यातील रनाळा येथील शेतकरी शेतातील वाटाणा पिकाची मळणी यंत्राद्वारे मळणी करीत असताना मळणी यंत्रात हात सापडून कंबरेपर्यंतचा भाग आत गेल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना  आज (दि. १९) दुपारी १२ च्या सुमारास घडली. सुरेश दयाराम वैरागडे (वय ३५, रा. रनाळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  सुरेश हा शेतात मळणी यंत्राद्वारे वाटाणा पिकाची मळणी करायला गेला होता. दुपारी १२च्या दरम्यान मळणी यंत्रावर काम करणारा मजूर पाणी पिण्यास थांबला असता स्वत:च सुरेश मळणी यंत्रावर चढून मळणी करू लागला.  मात्र, मळणी यंत्रात टाकलेला वाटाणा हाताच्या साहाय्याने दाबत असताना हाताचा दाब जास्त झाल्याने हात मळणी यंत्रात ओढला गेला. मळणी यंत्राचा दबाव जास्त असल्याने प्रथम हात व नंतर डोक्यासोबतच कमरेपर्यंतचा भाग मळणी यंत्रात ओढला गेला. यातच सुरेशचा मृत्यू झाला.

सुरेशच्या मागे पत्नी व दोन लहान मुली असून त्याच्या अकाली मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. अधिक तपास पवनीचे पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे करत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT