डोंगरगाव येथे वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला.  File Photo
भंडारा

Bhandar Lightning : शेतात रोवणी करणाऱ्या २ महिलांचा वीज कोसळून मृत्यू

अविनाश सुतार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : शेतात रोवणी सुरू असताना अचानक वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. ही घटना मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे सोमवारी (दि.१५) दुपारी ४ च्या सुमारास घडली. आशा सोनकुसरे आणि कलाबाई गोखले (दोन्ही रा. आंधळगाव) अशी मृत महिलांची नावे आहेत. या घटनेत अन्य महिला मजूरही जखमी झाल्या आहेत. (Bhandar Lightning)

Summary

  • डोंगरगाव येथे आज दुपारी वीज कोसळली

  • शेतात रोवणी करणाऱ्या महिलांचा मृत्यू

  • अन्य महिला मजूरही जखमी

आज सोमवारी डोंगरगाव येथील शेतशिवारात रोवणीचे काम सुरू असताना अचानक ढग दाटून आले. दरम्यान अचानक वीज कोसळल्याने आशा सोनकुसरे आणि कलाबाई गोखले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रुख्मा निमजे, मयना सोनकुसरे, वंदना जिभकाटे या महिला जखमी झाल्या. (Bhandar Lightning)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT