प्रातिनिधिक छायाचित्र.  file photo
भंडारा

Bhandara Crime | साकोलीतील श्याम हॉस्पिटलचे डॉ. देवेश अग्रवाल पोक्सो प्रकरणात अजूनही फरार; दोन्ही भावांवरही गुन्हा दाखल

पोलिसांचा शोध सुरू : तिघांवरही लुकआऊट नोटीस

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: साकोली येथील श्याम हॉस्पिटलचा संचालक असलेला पोक्सो गुन्ह्यातील आरोपी डॉ. देवेश अग्रवाल अजूनही फरार असून त्याला पळून जाण्यास मदत करणारे त्याचे दोन्ही भाऊ डॉ. भरत अग्रवाल व जितेश अग्रवाल यांनाही पोलिसांनी आरोपी बनविले आहेत. या प्रकरणात एकूण तीन आरोपी असून तीनही आरोपी पोलिस रेकॉर्डनुसार फरार घोषित करण्यात आले असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक निलेश मोरे, पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी माध्यमांना दिली.

पोक्सो अंतर्गत फरार असलेला आरोपी डॉ. देवेश अग्रवाल याचा शोध अजूनही सुरू आहे. डॉ. देवेश अग्रवालच्या वकीलाने २२ जुलैला नागपूर उच्च न्यायालयात अंतरिम जामीनाकरिता अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला. त्याला मदत करणाºया त्याच्या दोन्ही भावांना आरोपी करण्यात आले असून त्यांच्यावरही वेगवेगळ्या कलमांतर्गत साकोली पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्या हॉस्पिटलचा परवाना रद्द करणे तसेच वैद्यकीय परवाना रद्द करण्याची कारवाई पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आली असून मेडिकल कौन्सिलला तसे पत्र पाठविण्यात आले आहे. त्याची चलअचल संपत्तीची माहिती घेणे सुरू असून लवकरच ही संपत्ती जप्त करण्यात येईल.

त्यांच्या नातेवाईकांकडून चुकीची माहिती दिली जात आहे. आरोपींना मदत करणे, आरोपींची माहिती असून सुद्धा माहिती पोलिसांपासून लपविणारे नातेवाईक अशांना सुद्धा आरोपी बनविले जात आहे. आरोपीस शोधण्यासाठी सर्व पोलिस यंत्रणेला लुक आऊट नोटीस देण्यात आले आले. या तिन्ही आरोपींबाबत कुठलीही माहिती मिळाल्यास पोलिस स्टेशन साकोली येथे कळविण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT