Accident  Pudhari
भंडारा

Bhandara Accident : भरधाव कारची दुचाकीला धडक; तरुण जागीच ठार, 7 वर्षांचा बालक जखमी

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : भंडारा-लाखनी राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला सात वर्षांचा बालक सुदैवाने किरकोळ जखमी झाला. हा भीषण अपघात गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील गडेगाव शिवारात घडला.

संतोष सुधाकर बांते (वय ३०, रा. मोहदुरा, ता. भंडारा) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर आयुष नरेंद्र कमाने (वय ७, रा. गडेगाव) असे जखमी बालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बांते हे आयुष याला सोबत घेऊन दुचाकीने जात होते. गडेगाव परिसरात पोहोचताच भरधाव वेगात आलेल्या एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की संतोष गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात चिमुकला आयुष किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

याप्रकरणी लाखनी पोलिसांनी कारचालक खेमचंद दुवेदास कावळे (वय २७, रा. भंडारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कपूर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT