भरधाव कारने दुचाकीला उडवले; दोन गंभीर जखमी File Photo
भंडारा

भंडारा : भरधाव कारने दुचाकीला उडवले; दोन गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : शहरामध्ये भरधाव कारने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीवरुन जाणारे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मागील २५ दिवसांत हिट अँड रनचे हे दुसरे प्रकरण उघडकिस आले आहे. हा अपघात सोमवारी (दि.9) एक वाजताच्या सुमारास देव्हाडी रेल्वे उड्डाणपुलावर घडला. अपघातानंतर चारचाकी वाहनाने घटनास्थळावरुन पळ काढला.

सुकळी येथील अक्षय मंगरू फेंडर (वय.२७) तसेच त्याची काकी नंदा राजेंद्र फेंडर (वय.४२) हे तुमसर येथे काही कामानिमित्त दुचाकीने जात होते. यावेळी देव्हाडी उड्डाणपुलावर दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. त्यांच्या हाताला पायाला व तोंडाला गंभीर इजा झाली. धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन घटनास्थळावरून खापा मार्गे फरार झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नंदा व अक्षय यांना परिसरातील नागरिकांनी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.

२५ दिवसांपूर्वी देव्हाडी-तुमसर या राज्य महामार्गावर चारचाकी वाहनाने सायकलस्वारास जोरदार धडक दिली होती. अद्याप ते आरोपी पोलिसांना मिळाले नाहीत. चार महिन्यापूर्वी याच महामार्गावर पलस तलमले यांचा हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झाला होता. त्या आरोपींचा अजूनही शोध लागला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT