माजी खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र  Pudhari File Photo
अमरावती

माजी खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले आहे. धमकीच्या पत्रामध्ये सामूहिक अत्याचाराचा तसेच घरासमोर गाय कापण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यासह दहा कोटी रुपयांची खंडणी देखील मागितली आहे. खंडणी दिली तरच आपण पिछा सोडू असे त्यामध्ये म्हटले आहे. अमीर नावाच्या व्यक्तीने हे पत्र माजी खासदार नवनीत राणा यांना पाठविले आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि.११) माजी खासदार नवनीत राणा यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

या धमकीच्या पत्रामध्ये नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांच्या बद्दलही वादग्रस्त शब्दांचा वापर करण्यात आला आहे. पत्र पाठविणारा आमिर नावाचा व्यक्ती हैदराबादचा असून त्याचा कोणत्याही पक्षाच्या सोबत संबंध नसल्याचेही म्हटले आहे. यासह माझा भाऊ दुबईला राहतो, त्याने तुम्हाला दुबईतून फोन केला होता. मात्र तुम्ही त्याचा फोन उचलला नसल्याचे पत्रामध्ये सांगत फोन नंबरचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. हे पत्र आमिर नावाच्या व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या हाताने लिहिले असल्याचे पत्रामध्येच म्हटले आहे. पाकिस्तान जिंदाबाद असा उल्लेखही त्यामध्ये करण्यात आला आहे. याप्रकरणी माजी खासदार नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी (दि.११) तक्रार दाखल केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT