Nagpur Amravati Highway Car Accident
अमरावती : नागपूर ते अमरावती या राष्ट्रीय महामार्गावर वरखेड फाट्यानजीक भरधाव कारचा टायर फुटल्याने कार पलटी होऊन तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी घडली.
भूषण गणेश येलकर (वय २८),अर्पित गणेश येलकर (वय २७), महेंग जगतपाल शाहू (वय १९) सर्व रा. नागपूर असे या अपघातातील जखमीची नावे आहे.
अपघातातील तीन जण कारने नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जात होते. दरम्यान भारवाडी ते वरखेड फाट्यानजीक अचानक कारचा समोरील टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यातच कार थेट महामार्गाच्या खाली उतरली व पलटी झाली.
यावेळी जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.
मंगेश ठाकरे, राज रियाड यासह घटनास्थळी उपस्थिती नागरिकांनी जखमीना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदतकार्य केले. तिवसा पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.