मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर Pudhari Photo
अमरावती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे २७ व २८ सप्टेंबरला अमरावती दौर्‍यावर येणार आहेत. २७ तारखेला सकाळी ७.३० वाजता राज ठाकरे यांचे अमरावती रेल्वे स्टेशनवर आगमन होणार आहे. त्यानंतर हॉटेल ग्रॅन्ड मेहफिल इन येथे विदर्भातील सर्व ११ ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची राज ठाकरे आढावा बैठक घेणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा आढाव घेण्यात येणार आहे. तर २८ सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा,भंडारा,गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेतला जाईल. तसेच आगामी विधानसभा निवडणूकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभेच्या दृष्टीने विदर्भात राज ठाकरे यांनी विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे. विदर्भातील प्रमुख पदाधिका-यांची अमरावतीत एकाच महिन्यात दुस-यांदा आढावा बैठक होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. अमरावतीत होणाऱ्या विदर्भातील या बैठकीच्या आयोजनाकरीता मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीला लागले आहे. २७ सप्टेंबरला शुक्रवारी अमरावती रेल्वे स्टेशनवर सकाळी ७.३० वाजता राज ठाकरे यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती मनसेचे अमरावती शहराध्यक्ष धिरज तायडे व बडनेरा शहराध्यक्ष गौरव बांते यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT