Arun Sapkal  Pudhari
अमरावती

Sindhutai Sapkal Son Case | चिखलदारा वसतिगृह विनयभंग प्रकरण: सिंधुताई सपकाळ यांच्या मानसपुत्राचा जामीन फेटाळला

अरूण सपकाळविरुध्द विनयभंग, पोक्सो आणि अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Arun Sapkal Bail Rejected

अमरावती : वसतीगृहातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील स्थानिक न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. अरुण सिंधुताई हरबाजी सपकाळ असे जामीन अर्ज फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. चिखलदारा येथील वसतीगृहातील अल्पवयीन मुलगी १७ ऑक्टोबर रोजी स्वयंपाक घरात काही काम करीत होती.

दरम्यान, वसतीगृहाचा सचिव सिंधुताई सपकाळ यांचा मानसपुत्र अरुण सपकाळ स्वयंपाक घरात आला आणि मुलीसोबत त्याने अश्लिल चाळे केल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या मुलीने घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. दुसर्‍याच दिवशी तिचे आई-वडील वसतीगृहात पोहचले आणि संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी त्यांनी चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

त्या आधारावर पोलिसांनी अरुण सपकाळविरुध्द विनयभंग, पोक्सो आणि अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तेव्हापासून सपकाळ चिखलदर्‍यातून पसार आहे. दरम्यान त्याच्या वकीलाने जामीनाकरीता येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बुधवारी संबंधित अर्ज न्यायालयाने युक्तिवाद ऐकून फेटाळून लावला. चिखलदरा पोलीस अरुण सपकाळच्या शोधात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT