कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली शोधकार्य करताना सुरक्षा जवान Pudhari Photo
अमरावती

परतवाडा येथे इमारत अंगावर कोसळून वृद्ध महिला ठार; तीन जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील परतवाडा येथे पेंशनपुरा परिसरात तायडे प्लॉटमध्ये शनिवारी (दि.७) पहाटे इमारत कोसळली. या अपघातात एका वृद्ध महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी आहेत. आशा उमेकर (वय ७०) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. तर दुसर्‍या मजल्यावर राहत असलेले भाडेकरू या घटनेतून थोडक्यात बचावले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा शहरातील तायडे प्लॉट पेंशनपुरा भागात आशा उमेकर (वय ७०) या राहत होत्या. तर त्याच इमारतीत दुसरा मजल्यावर दोन भाडेकरू राहत होते. शनिवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान ती इमारत कोसळली. यामध्ये आशा उमेकर यांचा घटनास्थळी ढिगाराखाली दबल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या घटनेत पैतराज घोरपडे, रुची घोरपडे, विशाल घोरपडे हे तिघे जखमी झाले आहे.

घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच अचलपूर नगरपरिषद चे अधिकारी - कर्मचारी तसेच महसूल विभाग, परतवाडा- अचलपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी ,कर्मचारी व डीडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर बचावकार्य करण्यात आले. जेसीबीच्या साह्याने संपूर्ण ढिगारा बाजूला करण्यात आला. ७० वर्षीय वृद्ध महिला आशा उमेकर यांचा मृतदेह सुद्धा बाहेर काढण्यात आला. या घटनेत जखमींना अमरावती येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

यावेळी घटनास्थळी अचलपूरचे तहसीलदार संजय गरकल, परतवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप चव्हाण, अचलपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धीरजकुमार गोहाड, अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन मेहत्रे तसेच अग्निशमन दल, महसूल विभागाचे अधिकारी- कर्मचारी, डीडीआरएफ चे पथक दाखल झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT