लखनौत तीन मजली इमारत कोसळली, चार ठार

२७ जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर
Lucknow Building collapse
त्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्‍ये आज (दि. ७) तीन मजली इमारत कोसळली. Photo ANI
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्‍ये आज (दि. ७) तीन मजली इमारत कोसळली. ट्रान्सपोर्ट नगरमध्ये झालेल्‍या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्‍यू झाला आहे. बचावकार्य सुरु आहे, अशी माहिती लखनौचे विभागीय आयुक्त रोशन जेकब यांनी दिली. आतापर्यंत 30 जणांची सुटका करण्यात आली. यापैकी २७ जखमींना लोकबंधू रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्‍यान, मुख्यमंत्री योगी यांनी या अपघातावर दु:ख व्‍यक्‍त केले आहे.

ट्रान्सपोर्ट नगरमधील हरमिलाप बिल्डिंगमध्‍ये औषधांची खरेदी-विक्री होते असे. आज सायंकाळी ही इमारत कोसळली. घटनास्‍थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकार्‍यांनी धाव घेतली. जिल्हाधिकारी गंगवार यांनी सांगितले की, या दुघटनेत इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत १३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जखमींना लोकबंधू रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news