Accident In Amravati
नियंत्रण सुटल्याने नाल्यात घुसलेली रिक्षा Pudhari Photo
अमरावती

अमरावती : शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षाचा अपघात; पाच गंभीर

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षाचा तिवसा-सार्शी मार्गावर अपघात झाला. या अपघातात दहा शेतमजुर जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच शेतमजूर गंभीर आहेत. ऑटो क्र. एमएच 29 एडी 7339 गुरुवारी (दि. 25) सकाळी गावातील शेतमजूर घेऊन शेताकडे जात होता. दरम्यान ऑटो समोर श्वान आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण वाहनावरून सुटले. यानंतर ऑटो रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट नालीमध्ये घुसली.

या अपघातात 10 मजूर जखमी झाले आहेत. त्यापैकी गंभीर असलेल्या 5 शेतमजूराना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर 5 शेतमजूर किरकोळ जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व शेतमजूर तिवसा गावातील आहेत. जखमींमध्ये ऑटो चालक योगेश कानबाले (वय 45) याच्यासह रोशनी सरर (वय 40), सुनिता गौरखेडे (वय 43), अंजु मंदाने (वय 47), सुनिता ढोक (वय 44), रीना प्रवीण गारोडे (वय 45), सुनिता अरविंद मुंदाने (वय 47), सकुनाबाई गौरखेडे (वय 60), लीला गौरखेडे (वय 40), रेखा गोरडे (वय 31) या शेतमजुरांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT