विजय नागापुरे Pudhari
अमरावती

Amravati Police Death | धक्कादायक: अमरावती पोलीस आयुक्तालयात पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून जीवन संपविले

सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडली

पुढारी वृत्तसेवा

Amravati Police Constable Death

अमरावती : अमरावती शहर पोलीस दलातील 'क्यूआरटी' (QRT) पथकात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस आयुक्तालयातच स्वतःवर गोळी झाडून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय नागापुरे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज (दि. २६) सकाळी १० च्या सुमारास पोलीस आयुक्तालयातील क्यूआरटी कक्षामध्ये घडली. विजय नागापुरे यांनी आपल्याकडे असलेल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत नागापुरे यांचा जागीच मृत्यू झाला होता.

पोलीस आयुक्तालयासारख्या सुरक्षित आणि गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

विजय नागापुरे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद की कामाचा ताण? या दिशेने पोलीस आता तपास करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT