

Nagpur Amravati Highway accident
अमरावती : नागपूरकडून अमरावतीकडे भरधाव जात असलेल्या कारची मोझरी बायपासवर उभ्या असलेल्या ट्रक ट्रेलरला जोरदार धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.२५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शेख अमन शेख अलीम (वय २५ रा .कळमना नागपूर) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एम एच ०५ बी जे १६९६ क्रमांकाची कार नागपूरकडून अमरावतीकडे जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या एन एल ०१ एएच ०३८५ क्रमांकाच्या ट्रेलरला कार जोरदार धडकली. यात कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमधील तीन प्रवाशांपैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना अमरावती येथे उपचार साठी दाखल केले. पुढील तपास तिवसा पोलीस करत आहे.