अमरावती : एमडी ड्रग्स व गांजा तस्करांविरुद्ध पोलीस विभागाच्या वतीने विशेष मोहीम चालविण्यात येत आहे. या अंतर्गत मोठे यश अमरावती गुन्हे शाखाच्या हाती आले आहे. शहर व जिल्ह्यात एमडी ड्रग्सचा सप्लाय करणारा डिस्ट्रीब्यूटर फैयाज अल्ताफ अहमद कुरेशी (वय २५, टेका परिसर ,न्यू व्यास नगर, नागपूर) याला गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूरमधून ताब्यात घेतले आहे. पथक त्याला घेऊन गुरुवारच्या रात्री शहरात दाखल झाले आहे.
त्याच्या कडून आणखीन विचारपूस केली जात आहे. आरोपी फैयाज कुरेशी कोठून ड्रग्स आणत होता आणि कुठे कुठे पाठवत होता याची चौकशी त्याच्याकडून केली जात आहे. माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसापूर्वी पांढरी हनुमान मंदिर परिसरातून अब्दुल राजीक अब्दुल ताहीर (वय ३५, अलिहाल कॉलनी ) याला ५७ ग्रॅम ड्रग्स सह अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांना माहिती मिळाली की , ड्रग्स तस्करीचे नागपूर कनेक्शन आहे. त्याने विचारपूसमध्ये पोलिसांना सांगितले की, डिस्ट्रीब्यूटर फैयाज अहमद अल्ताफ कुरेशी अमरावती शहरात वेगवेगळया तस्करांना ड्रग्स सप्लाय करतो. यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर मध्ये कार्यवाही करून आरोपी फैयाज अहमद याला गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. नागपूर मध्ये औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून त्याला शहरात आणले. शुक्रवारी सकाळ पासून पोलीस आयुक्तालय मध्ये गुन्हे शाखेचे अधिकारी त्याच्याकडून विचारपूस करत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, रमेश धुमाळ, श्याम घुगे, सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात एपीआय मनीष वाकोडे, पीएसआय गजानन सोनोने, अजय मिश्रा, सतीश देशमुख, फिरोज खान, मंगेश लकडे ,सचिन बहाडे, सुधीर गुडधे, नाझीम शेख ,नईम बेग, विकास गुडधे, चेतन कराडे, सुरच चव्हाण, रंजीत गावंडे, सागर ठाकरे, योगेश पवार, राजीक रायलीवाले आदिनी केली.