File Photo
अमरावती

Amravati Crime | शेतात महिलेवर अत्याचार; आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरी

Amravati Court News | अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Amravati Sexual Assault Verdict
अमरावती :
बोरगाव धर्माळे परिसरात शेतात वास्तव्यास असलेल्या महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमरावती जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. ३) यशवंत आनंद गोस्वामी यांच्या न्यायालयाने मंगळवारी (दि. १७) हा निकाल दिला.

जिवनु रिमकलाल धुर्वे (वय ३७, रा. धागडीया, जि. छिंदवाडा; सध्या रा. बोरगाव धर्माळे) असे दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहितीनुसार, २८ जून २०२४ रोजी २२ वर्षीय विवाहित महिला पती व लहान बाळासह शेतातील घरात राहत होती. त्यावेळी पती बाहेर गेले असताना आरोपीने घरात जबरदस्तीने प्रवेश करून महिलेला मारहाण केली व तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास अधिकारी शिरसाट यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून पुरावे संकलित केले. सरकारी पक्षाने न्यायालयात दहा साक्षीदार तपासले. वैद्यकीय अहवाल व इतर पुराव्यांवरून आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाले. न्यायालयाने कलम ३७६ अंतर्गत १० वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रुपयांचा दंड, कलम ४५२ अंतर्गत ३ वर्षांची सक्तमजुरी व २ हजार रुपयांचा दंड, तसेच कलम ३२३ अंतर्गत ६ महिन्यांची सक्तमजुरी व ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. शशिकिरण भगवतीप्रसाद पलोड यांनी बाजू प्रभावीपणे मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT