Accident File Photo
अमरावती

Amravati Accident | भातकुली-पांढरी रायपूर मार्गावर कारची मोपेडला धडक; दोघांचा मृत्यू

भातकुली मार्गावर पांढरीजवळ अपघात

पुढारी वृत्तसेवा

Bhatkuli Car Moped Collision

अमरावती : भातकुली-पांढरी रायपूर मार्गावर कार आणि मोपेडची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.२२) पांढरी गावाजवळ हा अपघात घडला. अभिजीत अरुण पार्डीकर (वय ३५) आणि अशोक चंपतराव राऊत (वय ६०), दोघेही रा. आनंदनगर, खोलापुरी गेट अमरावती, अशी मृतांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत पार्डीकर आणि अशोक राऊत हे मोपेडवरून अमरावतीच्या दिशेने भातकुलीकडे जात होते. पांढरी गावाजवळ समोरून येणार्‍या कारशी त्यांच्या मोपेडची जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडले. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले.

नागरिकांनी जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर भातकुली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीनंतर अपघाताचे ठिकाण बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बडनेरा पोलिसांना माहिती देण्यात आली.

बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. मोपेडची झालेली अवस्था पाहता धडक अत्यंत जोरदार असल्याचे स्पष्ट झाले. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, कारचा वेग किती होता आणि दोन्ही वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाले होते का, याचा तपास बडनेरा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT