Amravati Accident : अमरावतीत भरधाव कार दुभाजकावर चढली; सुदैवाने जीवितहानी टळली, चालक मात्र पसार

Amravati Accident
Published on
Updated on

अमरावती : अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील कुथे हॉस्पिटलसमोर भरधाव कार थेट रस्त्याच्या दुभाजकावर (डिव्हायडर) चढल्याची घटना रविवारी (दि. २०) रात्री घडली. अपघातानंतर कार घटनास्थळीच सोडून चालक पसार झाल्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुथे हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरून कार जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली आणि त्यावर चढली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली.

कार दुभाजकावर धडकल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. अपघात नेमका कशामुळे झाला आणि वाहन चालवताना चालकाची नेमकी स्थिती काय होती, याबाबत राजापेठ पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news