Amaravati Accident File Photo
अमरावती

Amravati Accident | अमरावतीत मोटरसायकल - स्कूटीचा अपघात, युवक ठार

एका महिलेसह दोन तरुणी गंभीर जखमी : अप्पर वर्धा धरण मार्गावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील मोर्शी ते सिंभोरा रोडवरील नशीदपूर फाट्याजवळ मोटरसायकल व स्कुटीच्या आमने-सामने झालेल्या धडकेत एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाृ.तर एका गर्भवती महिलेसह दोन तरूणी गंभीर आहेत. जखमींना एक्झॉन हॉस्पिटल अमरावती येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात आज दि.६ जूलै रोजी सायंकाळी ६ वाजताचे सुमारास झाला.

मृतक तरुणाचे नाव नकुल राजेश नवले (वय २३,रा.अंतोरा,जि.वर्धा) असे आहे. तर करिष्मा भीमराव रामटेके (वय ३२, रा. वरुड),महिमा प्रदीप भोकरे (वय २५, रा. अमरावती) व दिपाली हरिदास पाटील (वय २३, रा.ब्राह्मणवाडा भगत) असे जखमींचे नाव आहे. यातील महिलेसह दोन तरुणी इसाफ बँक मोर्शी येथे कार्यरत असून या तिघी मैत्रिणी आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आपली स्कुटी क्र.एम. एच.२७ डी यु ६५०९ ने अप्पर वर्धा धरण बघण्यासाठी गेल्या होत्या.

दरम्यान परत येत असतांना नकुल राजेश नवले (वय २३ रा.अंतोरा) हा आपली मोटर सायकल क्र.एम एच २७ एपी २७६५ ने अंतोरा येथे जात असतांना या दोन्ही दुचाकी वाहनांची आमने-सामने जबर धडक झाली. या अपघातात नकुल नवले याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तानाजी युवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पंडागरे, रवी परतेती, श्याम मोरे,यश पांडे, अभिषेक झोड,तेजस नागले यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतक व जखमींना इरफान यांच्या अ‍ॅम्बुलन्सद्वारे उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी जखमींवर औषधोपचार केल्यानंतर अपघातातील महिलेसह दोन तरुणीला अतिशय गंभीर मार बसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रवाना केले. पुढील तपास पोलीस करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT