कवठा कडू फाट्याजवळ एसटी बस आणि दुचाकीचा असा अपघात झाला  
अमरावती

Amaravati bike bus accident youth killed|भरधाव दुचाकी थेट बसच्या खाली गेली, भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी

कवठा कडू फाट्याजवळ भीषण अपघात, अंजनगाव बारीत शोककळा

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : मालखेड रेल्वे मार्गावरील कवठा कडू फाट्याजवळ भरधाव दुचाकीची बसला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. यात अंजनगाव बारी येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत दुचाकीवर प्रवास करणारी त्याची मोठी आई गंभीर जखमी झाली. ही दुर्दैवी घटना आज (दि.१६) सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास घडली.

कृष्णा दिलीप येरणे (वय २२, रा. अंजनगाव बारी) हा आपल्या मोठ्या आईला सोबत घेऊन कवठा येथून अंजनगाव बारीकडे दुचाकीने येत होता. दरम्यान, कवठा कडू फाट्याजवळ एमएच- ४० एक्यू ६२०८ क्रमांकाच्या बसला दुचाकीची जोरदार धडक बसली.

धडक इतकी भीषण होती की दुचाकी थेट बसच्या खाली गेली. या अपघातात कृष्णा येरणे याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची मोठी आई गंभीर जखमी झाली.

अपघाताच्या वृत्ताने अंजनगाव बारी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या २२ वर्षांच्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. कृष्णा याच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा आप्तपरिवार आहे. त्याच्या अकाली निधनाने येरणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्यावर हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT